
Putra Vhava Aisa | पुत्र व्हावा ऐसा
Editor:
Anand Hardikar | आनंद हर्डीकर
'सतरा वर्षांचा एक तरुण माय आणि
मायभूमी यांच्यापासून दूर, एका अनोळखी
जगात जातो, तेव्हा त्याच्या शिदोरीमध्ये
बांधलेली असते अपार जिज्ञासा
आणि अथक ध्यासवृत्ती !
आणि मग सुरू होते ज्ञानपंढरीकडे जाणारी
त्याची वाटचाल... विश्वाची पायाभरणी
करणा-या मूलकणांची रहस्यं उलगडणारी,
जणू विधात्याच्याच मनाचा वेध घेणारी
अशी वाटचाल !
अशी वैज्ञानिक वाटचाल करत राहणारा
डॉ. आशुतोष कोतवाल यानं
आपल्या उपजत प्रज्ञेला दृढसंकल्पाची,
चिकाटीची, परिश्रमांची आणि मनोधैर्याची
जोड दिली. मूलकण-विज्ञान-क्षेत्रातलं
आजचं त्याचं अग्रगण्य स्थान
हे जलपृष्ठावर दिसणा-या हिमशिळेच्या
टोकासारखं आहे.
त्याच्या यशामागं दडलेली आव्हानं,
संघर्ष आणि अविचल आशादृष्टी यांची
ही त्याच्या आईनंच सांगितलेली कथा
अनेक युवकांना प्रेरणादायी ठरू शकेल.
ISBN: 978-81-7434-949-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०१६
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१७
- मुखपृष्ठ : शेखर गोडबोले
- मांडणी व अंतर्गत सजावट : शेखर गोडबोले - राजू देशपांडे
- राजहंस क्रमांक : B-04-2016