Mee Ek Kalandar | मी एक कलंदर
प्रत्येकाचं जीवन हे नियती व त्या व्यक्तीचा स्वभाव यांच्या मिश्रणातून घडत असतं. कुणी कितीही ठरवलं तरी शेवटी नियती आणि अन्य काही गोष्टी कोणाच्या हातात नसतात. तुमचा स्वभाव आनुवंशिकता ठरवते आणि नियती तर अज्ञातच असते. ही अज्ञात नियती आपल्याकडे वळविण्यासाठी जीवनात जो संघर्ष, प्रयत्न करावे लागतात; त्यामुळेच जीवनात मजा येते. वयाच्या बाराव्या वर्षी शालेय जीवनाला सुरुवात करून, अनेक अडथळे अन विघ्नांवर मात करून मी वयाच्या सदतिसाव्या वर्षी डॉक्टर झालो आणि पुढे वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी पोस्ट ग्रज्युएशन केले. हा मधला प्रदीर्घ काळ चित्रविचित्र घटना, वेडीवाकडी वाटा-वळणं व अडथळ्यांच्या शर्यतीनं भरलेला होता... कलंदर वृत्तीनं जगलेल्या आपल्या आयुष्याची कहाणी सांगत आहेत डॉ. गंगाधर गोरे
ISBN: 978-93-86628-63-3
- पहिली आवृत्ती - १० फेब्रुवारी २०२०
- मुखपृष्ठ : जय प्रयाग
- बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८ .५"
- बुक कोड - B-02-2020