
Mmadhyam varg : Ubha, aadva, tirpa | मध्यम वर्ग : उभा, आडवा, तिरपा
* गेल्या पंचवीस वर्षांत सर्वांत जास्त उत्क्रांत झालेला वर्ग कोणता ?
* जागतिकीकरणाचा सर्वांत जास्त लाभधारक, उपभोक्ता वर्ग कोणता ?
* संपूर्ण बाजारव्यवस्था, मनोरंजनाची साधने, सेवा-सुविधा यांचा सर्वाधिक
उपभोग घेणारा वर्ग कोणता ?
* राजकारण, समाजकारण, अर्थकारण, प्रसारमाध्यमे यांवर सर्वाधिक प्रभाव
असलेला वर्ग कोणता ?
* जागतिकीकरणानंतर बदल, संधी, पैसा, सुख, स्वप्नपूर्ती यांच्या स्थित्यंतराच्या
वावटळीत सापडलेला वर्ग कोणता ?
* ‘टुकीने संसार’ आणि ‘नेकीने नोकरी’ करणारा एकेकाळचा वर्ग कोणता ?
* जागतिकीकरणाच्या काळात सर्वाधिक टीका होणारा वर्ग कोणता ?
* एकाच वेळी अचंबा, मत्सर, ईर्ष्या, असूया, हेवा, स्पर्धा, आदर, कौतुक,
अनुकरणाची तीव्र मनीषा, तिरस्कार यांसारख्या परस्परविरोधी भावभावनांचा
धनी होणारा वर्ग कोणता ?
अशा या मध्यम वर्गाचे कालचे-आजचे आदर्श, परंपरा आणि प्रेरणा यांचा
ऊहापोह करत त्याची उभी, आडवी, तिरपी चर्चा करणारा लेखसंग्रह.
मध्यम वर्ग उभा, आडवा, तिरपा
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २०१७
- मुखपृष्ठ : बी. जी. लिमये
- राजहंस क्रमांक : K-01-2017