Manoos 'asa' ka vagato ? | माणूस 'असा' का वागतो ?

Manoos 'asa' ka vagato ? | माणूस 'असा' का वागतो ?

नैतिकता अन् सामाजिक विषमता, धर्मभावना आणि आध्यात्मिकता, 

प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय, अनुपालन, धर्म-जात भेदाभेद, 

कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा... माणसाच्या वर्तनाचे असे 

अनेकविध पैलू. उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स, 

मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञान अशा विविध ज्ञानशाखांच्या 

मिलाफातून माणसाच्या वर्तनाचा अभ्यास चालू आहे. स्वत:चे सांस्कृतिक 

पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. 

सहकार्य, परोपकार, साहचर्य हे गुण माणसाच्या उत्क्रांतीत महत्त्वाचे ठरले आहेत.

माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच 

पेरली आहेत का ? मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता 

माणसातच आहे का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे - 

आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या 

एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक 

वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे – माणूस असा का वागतो ?

ISBN: 978-93-95483-86-5
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०२३
  • सद्य आवृत्ती : मार्च २०२४
  • चित्रकार : चंद्रमोहन कुलकर्णी
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • बुक कोड : I-04-2023
M.R.P ₹ 600
Offer ₹ 540
You Save ₹ 60 (10%)