Mahiti adhikar kayda | माहिती अधिकार कायदा
'माहिती अधिकार कायदा म्हणजे सरकारी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मिळालेले साधन आहे. पण ते प्रभावी ठरवण्यासाठी अंगी चिकाटी हवी आणि लोकहिताची कळकळही हवी. आपण या कायद्यानुसार - कोणकोणती माहिती मागू शकतो ? अशी माहिती मागवताना अर्ज कसा करायचा असतो ? तो अर्ज कुणाकडे पाठवायचा असतो ? यांसारख्या प्रश्नांपासून ... शासकीय कर्मचाऱ्यांबद्दलचा गोपनीय अहवाल मागता येतो का ? विद्यापीठाने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पुन्हा पाहणी करता येते का ? एफ.आय.आर.ची नक्कल मागता येते का ? हॉस्पिटलमधील रुग्णावर केलेल्या उपचाराची माहिती मागता येते का ? शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दलची नेमकी माहिती कुठे मिळेल ? यांसारख्या प्रश्नांपर्यंत ... असंख्य प्रश्नांची उत्तरे समजावून सांगणारे पुस्तक ! सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी आवर्जून वाचावे,असे पुस्तक ... '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७' X ९.५'
- पहिली आवृत्ती:मार्च २०१६
- सद्य आवृत्ती:फेब्रुवारी २०१६
- मुखपृष्ठ : अभय जोशी'