Mahanayak (Sampadit Avrutti) | महानायक (संपादित आवृत्ती)
'अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी! जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली. चलो दिल्लीची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एक घना रणसंग्राम! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूर नाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा- महानायक! देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधित कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या रणवाटावरून भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित जीवनकहाणी. '
- 'Pages: 724 Weight:770 ISBN:978-81-7434-860-9 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती: एप्रिल २०२२ (२३ वी आवृत्ती) पहिली आवृत्ती: नोव्हेंबर १९९८ Illustrator:सतीश देशपांडे'