Mi Sandarbha Pokhartoy | मी संदर्भ पोखरतोय
मला माहीत होतं थडग्यांवर जीव लावणारी माणसं सर्वच धर्मांत असतात माणसांवर जीव लावणारी माणसं सापडत नाहीत कुठेही! धर्मानं बांधल्या होत्या कधीच्याच कबरी माणसाचं अस्तित्व खोल पुरून कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रकोरीमधून माणसांच्या विचारांना विचारांनी तिलांजली देणारी माणसं विवेकाचा कत्लेआम करत असतात दररोज...
ISBN: 978-93-9032432-3
- पहिली आवृत्ती - १ फेब्रुवारी २०२१
- सद्य आवृत्ती - १ फेब्रुवारी २०२१ मुखपृष्ठ - चंद्रमोहन कुलकर्णी