Laypashima | लयपश्चिमा
'पॉप, रॉक, जॅझ, कंट्री, डिस्को -- गेल्या पिढीनं नावंच ऐकलेले हे पश्चिमी संगीतप्रकार. आजची तरुणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय, त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय. पण हे संगीतप्रकार म्हणजे केवळ कानांवर पडणा-या (की आदळणा-या?) सुरावटी नाहीत. पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रवासातील वेगवेगळ्या पाऊलखुणा म्हणजे हे संगीतप्रकार. संगीताची समाजाशी असलेली सांगड दाखवणारे हे संगीतप्रकार. बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतून साकारलेले हे संगीतप्रकार. या सा-या संगीतप्रकारांची केवळ माहिती नाही, तर अनुभव देणारं - जीवनशैली अन् संगीताचा अनुबंध उलगडणारं - मायकेल जॅक्सन - रिकी मार्टिनपासून मडोना - शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून रेखाटणारं लयपश्चिमा '
ISBN: 978-81-7434-930-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ६.५' X ८.२५" पहिली आवृत्ती:ऑक्टोबर २०१५
- सद्य आवृत्ती:ऑक्टोबर २०१५
- मुखपृष्ठ : रवि मुकुल'