
Lokshashi Ani Hukumshashi | लोकशाही आणि हुकुमशाही
आदरणीय नरेंद्रजी चपळगावकर यांचा आपल्या सर्वांचे प्रबोधन
करणारा एक ग्रंथ आपल्या भेटीसाठी येत आहे. ते लोकशाही समाजवाद व
गांधीवादाचे पुरस्कर्ते व अभ्यासक आहेत. विचारस्वातंत्र्यासाठी आपल्या
लेखणीने व वाणीने त्यांनी लढा दिला आहे. साहित्यसंमेलनातील
विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते.
अनेकांना हे भाषण ऐकून कै. दुर्गाबाई भागवतांच्या प्रसिद्ध भाषणाची
आठवण झाली. चपळगावकर यांचे लेखन व त्यांची भाषणे अतिशय संयत व
समतोल असतात. ते विचार स्पष्टपणे मांडतात, पण त्यात अभिनिवेश
नसतो. ते कधीही दुसर्याच्या मताचा अनादर करीत नाहीत. सध्याचा काळ
हा आक्रस्ताळेपणाने विचार व्यक्त करण्याचा व न पटणार्या विचारांचा
अवमान करण्याचा काळ आहे, असे कधीतरी वाटते. या काळात
चपळगावकरांचे लेखन व त्यांची भाषणे फार आशादायक वाटतात.
लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे ते नुसतेच पुरस्कर्ते नाहीत, तर ते
विचार ते प्रत्यक्षपणे आचरणात आणतात. लोकशाही संस्कृतीचा पुरस्कार
करणार्यांना त्यांचे लेखन आशेच्या किरणासारखे वाटते.
न्या. अभय ओक,
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
लोकशाही आणि हुकुमशाही
- पहिली आवृत्ती : २६ जानेवारी २०२५
- मुखपृष्ठ, अंतर्गत मांडणी : शेखर गोडबोले
- बाईंडिंग : हार्ड बाईंडिंग
- आकार : ६ " X १० "
- बुक कोड : A-02-2025
More Books By Narendra Chapalgaonkar | नरेंद्र चपळगावकर

