Kurukshetra | कुरुक्षेत्र
'‘नैतिकता’ म्हणजे ‘अमुक’ आणि ‘अनैतिकता’ म्हणजे ‘तमुक’ म्हणून ‘अमुकच’ बरोबर... असं अ • ब • क म्हणून अ • क इतवंâ साधं समीकरण प्रत्यक्ष आयुष्यात नसतंच कधी! चांगल्यापासून ते वाईट परिस्थितीपर्यंतच्या आवर्तनांमधले कसोटीचे क्षण पदोपदी नैतिकतेच्या आणि अनैतिकतेच्या मधली सीमारेषा धूसर करीत नेतात. ही मधली धूसर वाटणारी वाट, सुबोध जावडेकर यांच्या सर्व कथा नेमकी पकडतात. कुरुक्षेत्रावर अर्जुनासमोर उभे ठाकले होते, त्यापेक्षा कितीतरी गुंतागुंतीचे प्रश्न आज आपल्यापुढे आहेत. त्यांना सामोरं जावं लागतंय. या प्रश्नांना तोंड देताना सदसद्विवेकबुद्धी जागवणा-या या ख-या गोष्टी. एकीकडे तुमच्या, आमच्या जगण्यातली अगतिकता दाखवताना दुसरीकडे काळ्या ढगांची रुपेरी किनारही तेवढ्याच ताकदीनं अधोरेखित करतात. '
ISBN: 978-81-7434-356-7
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जून २००६
- सद्य आवृत्ती : जून २००७
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'