Khande Sujalele Diwas | खांदे सुजलेले दिवस
या पानांमध्ये कविता नाही! एक ठणक आहे.
‘‘एक ठणक निघते काळजातून अन्
जाऊन बसते कागदावर तुम्ही ‘कविता' म्हणता तिला...''
ही ठणक आहे माणसाला, माणूसपणाला कलंकित
करणार्या घटना अन् प्रसंगांची!
ही ठणक आहे जागतिकीकरणातून समोर ठाकलेल्या
प्रश्नांची, मानवी जीवनव्यवहारातील मूल्यर्हासाची !
भयकंपित करणारे बदल अन् बाजारीकरणातून
निर्माण झालेल्या शोषणाच्या नवनव्या तर्हांनी बरबटलेला
जडशीळ भोवताल पेलता पेलता घायाळ
झालेला समकाळ म्हणजे - खांदे सुजलेले दिवस
ISBN: 978-93-90324-83-5
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०२३
- चित्रकार : जितेंद्र साळुंके
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- बुक कोड : H-06-2023