Katha Tyanchya Vaktrutvachi | कथा त्यांच्या वक्तृत्वाची
अत्रे, पु.ल., पुरंदरे, भोसले आणि शेवाळकर हे मराठी वक्तृत्वाचे मानदंड! ही सारी वक्तृत्वशिखरेच; पण एक शिखर दुसऱ्यासारखे नाही – हे या शिखरांचे वैशिष्ट्य. प्रत्येकाची वक्तृत्वशैली निराळी, विचारप्रतिपादनाची रीत निराळी, आपल्या शब्दश्रीमंतीतून माय मराठीला ऐश्वर्य प्रदान करण्याचा बाज निराळा आणि हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा वशीकरण मंत्रही वेगळाच. या वाणीच्या उपासकांनी वाग्देवतेच्या गाभाऱ्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. रसिक अन् चोखंदळ श्रोत्यांनीही आपल्या हृदयसिंहासनावर त्यांना दिले अढळपद. या पाच वक्तृत्वशिखरांचे विहंगम दर्शन कथा त्यांच्या वक्तृत्वाची