Katha aklechya kaydyachi | कथा अकलेच्या कायद्याची

Katha aklechya kaydyachi | कथा अकलेच्या कायद्याची

'चोर चोरी करू शकत नाही, शासक कर लावू शकत नाही, 

भाऊबंदांमध्ये वाटणी होत नाही आणि तिचे ओझेही वहावे लागत नाही. 

अशी संपत्ती म्हणजे बौद्धिक संपदा. 

तरीसुद्धा तिचेही रक्षण करावेच लागते. 

अगदी व्यक्तिगत पातळीपासून सामूहिक अन् राष्ट्रीय स्तरापर्यंत 

ही सृजन संपत्ती जपावी लागते, वाढवावी लागते.

 ही बौद्धिक संपदा तुम्हाला देत असते विशिष्ट हक्क. 

पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगौलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाइन - 

अशा अनेक प्रकारांनी हे हक्क तुम्हाला मिळतात. 

कसे मिळवायचे हे हक्क ? कसे राखायचे हे हक्क ? 

कुणी या हक्कांचा भंग केल्यास तो रोखायचा कसा ? 

राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय कायद्यांची यात काय भूमिका असते ? 

अशा अनेक मुद्द्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे - 

संशोधक-उद्योजकांपासून लेखक-प्रकाशकांपर्यंत, 

गीतकार-संगीतकारांपासून नाट्य-चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत, 

चित्रकार-छायाचित्रकारांपासून इंजिनीअर-तंत्रज्ञांपर्यंत, 

साऱ्या सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या अनमोल निर्मितीचे 

भान करून देणारे - 

कथा अकलेच्या कायद्याची 

ISBN: 978-93-86628-05-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५' X ८.५'
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१७
  • सद्य आवृत्ती : मार्च २०२०
  • मुखपृष्ठ : रवि मुकुल
  • राजहंस क्रमांक : I-02-2017
M.R.P ₹ 290
Offer ₹ 261
You Save ₹ 29 (10%)