Kariyar kase Nivdave? | करिअर कसं निवडावं?
'आयुष्याचे ध्येय ठरवताना... कधी कधी स्वतःची आवडच ठाऊक नसते. नव्या संधी कुठे उपलब्ध आहेत, हेही ठाऊक नसते. त्यामुळे आपले ध्येय काय आहे, हेही स्वतःला ठरवता येत नसते. या उलट... कधी कधी स्वतःची आवड स्वतःला पक्की ठाऊक असते. नव्या संधी कुठे खुणावत आहेत, हेही ठाऊक असते. आपले ध्येय काय आहे हेही मनाशी पक्के ठरलेले असते. पण ध्येयप्राप्तीचा नेमका मार्ग मात्र ठाउक नसतो. अशा वेळी गरज असते अनुभवी मार्गदर्शकाची. अशा वेळी गरज असते या पुस्तकाची. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करणारे हे पुस्तक त्यांच्या पालकांनाही नव्या वाटा दाखवील. '
ISBN: 978-81-7434-885-8
- बाईंडिंग ; कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००३
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०२४
- मुखपृष्ठ : हर्षद गोडबोले'