Kalawant Aani Vicharvant | कलावंत आणि विचारवंत
'कलावंत काय आणि विचारवंत काय ते प्रतिभावंत असतातच. पण बरेचसे अहंमन्य, त-हेवाईक, विक्षिप्त, व्यसनी, दुबळे! ते स्वत:तच मश्गुल असतात. ते प्रेमात होरपळून निघतात. दारिद्रयात पिचून जातात. आपल्या उत्कट प्रतिभेशीच त्यांच्या अनावर निष्ठा असतात. आपल्या प्रतिभाशाली निर्मितीतून ते जगाच्या इतिहासात आपलं नाव लखलखत ठेवतात. पण जगाच्या व्यवहारात मात्र ते नगण्य ठरतात. वेदना आणि संवेदनांच्या वावटळीत सापडलले हे प्रतिभेचे प्रेषित कधी आकाशाएवढे प्रचंड भासतात; तर कधी खसखशीच्या दाण्याएवढे छोटे वाटतात. त्यांच्या समग्र जीवनाचे, त्यातल्या जीवघेण्या संघर्षाचे, त्यांच्या उत्तुंग झेपांचे आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांच्या वाटयाला आलेल्या सुखदु:खाचे चित्रण करणारे पुस्तक – कलावंत आणि विचारवंत '
ISBN: 978-81-7434-126-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च १९९९
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २००४
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'