Kalyanilya Resha | काळ्यानिळ्या रेषा |
‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो. प्रफुल्ल शिलेदार