
Hasgat | हसगत
'हे पुस्तक ‘गमतीदार’ आहे, ते अशा अर्थानं की, गालांत हसण्यापासून तो थेट खळखळून धबधबा फुटल्यासारखं हसण्यापर्यंत हसण्याचे विविध प्रकार यातून अनुभवता येतात. खुमासदार शैलीतले यातले लेख खूपच वाचनीय झाले आहेत. कधीही कंटाळा आला तर उघडावं आणि एखादा लेख वाचून मिटून ठेवावं, असं हे पुस्तक आपल्या मिटलेल्या चित्तवृत्ती उजळून टाकतं. - जयवंत दळवी प्रभावळकरांच्या विनोदात उपहासानं जग सुधारण्याचा हेतू नसतोच. असतो तो आनंद देणं – हा एकमेव हेतू. लावायचीच झाली, तर त्याला पुष्कळ प्रतिष्ठित लेबलं लावता येतील; परंतु प्रभावळकरांच्या ‘असली’ विनोदाला ती लावून नयेत, या प्रांजळ मताचा मी आहे. याचं एकमेव कारण म्हणजे तो स्वतंत्र आहे. त्याचं घराणं कोणतं, हा गहन प्रश्न पढीक विद्वानांवर सोपवावा. - मं. वि. राजाध्यक्ष '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५ "
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००७
- सद्य आवृत्ती : जून २०१४
- मुखपृष्ठ : पुंडलिक वझे'
More Books By Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर


