
Hasa leko | हसा लेको
'हास्यकथांचा हा संग्रह आपल्या ब्रीफकेसमध्ये ठेवावा, फावल्या वेळी पुन:पुन्हा वाचावा आणि मनाला ताजेतवाने करावे असा... नक्कीच! हा लेखक माणसाच्या वागण्या-बोलण्यामध्ये असलेली हास्यास्पदता उघड करतो आणि नसलेलीही निर्माण करतो. मामंजीचे हे हास्यायन मराठी विनोदबुद्धीचा आगळावेगळा नमुना आहे. यामध्ये लुटुपुटीच्या बौद्धिक झटापटी आहेत. गंभीरता आणि बालिशता यांचा गंगाजमनी मेळ आहे आणि विनोदांचे शेवट म्हणजे चकित करणारे धक्के आहेत. मामंजीच्या या हास्यक्लबाचे आजीव सभासद होण्यासाठी तमाम मराठी वाचक पुढे सरसावतील, याची मला खात्री वाटते. - रा. ग. जाधव '
ISBN: 978-81-7434-330-7
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार ; ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००५
- सद्य आवृत्ती : जानेवारी २०१०
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'