Greece | ग्रीस
साडेतीन हजार वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास लाभलेला देश म्हणजे ग्रीस. आधुनिक लोकशाहीचा प्रारंभबिंदू म्हणजे ग्रीस. शास्त्र, कला, तत्त्वज्ञान यांचे पुरातन माहेरघर म्हणजे ग्रीस. सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरिस्टॉटल यांसारखे तत्त्वज्ञ अन् गणितज्ञ म्हणजे ग्रीस. एकीकडे ही सारी अभिमानास्पद परंपरा. तर दुसरीकडे आर्थिक दुरवस्था, बेरोजगारी, व्यसनासक्त तरुणाई यांनी झाकोळलेले वर्तमान. प्राचीन काळापासून अद्ययावत वर्तमानातील ग्रीसच्या विस्तृत पटाचा वेध…