
Gotra | गोत्र
आपल्या जगण्याच्या प्रवासात काही माणसे नकळतपणे येतात
आणि आपल्या भावविश्वाचे कोपरे व्यापून घेतात.
यातले काही दूरपर्यंत सोबत करतात, तर काही मध्येच थबकतात.
त्यांच्या असण्या-नसण्याची सवय आपल्याला झालेली असते.
त्यांच्या असण्याने आपण समृद्ध होत जातो,
तर नसण्याने पोरकेपणाची भावना आत खोलवर कायमची ठणकत असते.
कशी असतात ही माणसे ?
उत्तुंग म्हणून मिरवण्यापासून
सामान्य म्हणून स्वीकारण्या-नाकारण्यापर्यंतची ?
अशी माणसे आपल्याला पुरती कळली
या समजात आपण वावरत असतो;
पण प्रत्यक्षात ती किती कळलेली असतात ?
का ती अशी समजून घेताना आकलनाआधीच
आपल्या परिघातून निसटून जातात ?
आपल्या आयुष्यात आलेल्या आणि उभं-आडवं आयुष्यच व्यापून उरलेल्या
या माणसांविषयीचा हा एक मनोज्ञ प्रवास.
निरंतर चालणारा आणि तरीही चकवे निर्माण करणारा…
गोत्र
ISBN: 978-93-86628-73-2
- बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : १५ मे २०१९
- मुखपृष्ठ : बी. जी. लिमये
- बुक कोड : E-02-2019