Gof Janmantariche | गोफ जन्मांतरीचे
'निसर्ग फक्त `असतो. तो दुष्ट नाही आणि सुष्टही नाही. तो सुंदर नाही, कुरूप नाही; कनवाळू नाही आणि क्रूरही नाही. तो फक्त त्याच्या स्वयंभू स्वरूपात, अंगभूत नियमांनुसार वागत `असतो. निसर्गाच्या नियमांमधूनच उत्क्रांती जन्म घेते आणि उत्क्रांतीच्या नियमांमधून माणूस जन्माला येतो. केवळ माणूसच नाही, तर सर्वच जीवसृष्टी. उत्क्रांतीच्या अभ्यासातून उमगते माणूस आणि त्याचा भोवताल यांमधील नाते. अदभुत, उत्कंठावर्धक आणि अविश्वसनीय वाटावे, असे नाते! मात्र कितीही अविश्वसनीय वाटले, तरी विज्ञानाच्या नियमांनुसारच आकार घेणारे!! माणूस असा का झाला आणि असा का वागतो, याचा उत्क्रांतीच्या नजरेने घेतलेला हा चित्तथरारक वेध. '
ISBN: 978-81-7434-575-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती : जुलै २०१२
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०१५
- मुखपृष्ठ : कमल शेडगे'