Gosht : Eka kharya Idiot chi | गोष्ट : एका ख-या 'इडियट'ची
'ही संयुक्ता. दिल्लीसारख्या `कॉस्मोपॉलिटन शहरात जन्मली, वाढली. तिला तुमच्या-आमच्याप्रमाणेच वेगवेगळ्या विषयांत रस होता. मग तिनं सरधोपटपणे महाविद्यालयीन शिक्षण न घेता, आपल्याला हवं तेच शिकायचं ठरवलं. आईवडीलही ग्रेटच ! त्यांनी तिला चक्क साथ दिली. मग ही मुलगी चेन्नईला हातमागावर विणकाम शिकली. गाणं शिकली. `इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची तिनं पदवी सुवर्णपदकासह मिळवली. त्यानंतर तिनं `नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइनिंग मधला पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला. आता ती आंध्रप्रदेशातल्या पोचमपल्ली इथे हातमाग विणकरांच्या संस्थेमध्ये काम करते. निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांबरोबर तिचा संपर्क आहेच. परंतु विशेष म्हणजे आपलं काम करता करता मानवजातीच्या `समतेसाठी ती झटते आहे. या ख-या गोष्टीचं तात्पर्य एकच - मनापासून वाटतं, तेच करा. यश हमखास आहे ! '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे २०१०
- सद्य आवृत्ती : मे २०१०
- मुखपृष्ठ : रवि मुकुल'