Garagara garagara | गरागरा गरागरा

Garagara garagara | गरागरा गरागरा

'छोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी वेगळयाच दिसतात. त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा काहीसं वेगळं असतं - असू शकतं, अशी माझी समजूत आहे. त्या गोष्टींचं वर्णन करताना, त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत अशा चित्रविचित्र कल्पना आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा भाषा ती उधळतात. मुलांचं हे मूलपण माझ्या कविता-गाण्यांतून खेळवण्याचा खटाटोप आधीच्या 5 संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. हा एक ब-यापैकी उपक्रम आहे अशी पावती मुलांच्या शाळांतून आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून मला वेळोवेळी मिळते आहे. नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं. '

ISBN: 978-81-7434-170-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जानेवारी २०००
  • सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०१२
  • मुखपृष्ठ : साईनाथ रावराणे'
M.R.P ₹ 25
Offer ₹ 22
You Save ₹ 3 (12%)