
Ganityogi Dr. Shriram Abhyankar | गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर
'हे एका अवलियाचं चरित्र आहे.
मध्य प्रदेशात स्थायिक झालेल्या
कोकणी कुटुंबात जन्मलेला एक पोरगा...
शिक्षणानिमित्त मुंबई, लंडन, हार्वर्ड अशी शहरं फिरलेला विद्यार्थी...
गूढ प्रमेयं सोडवण्यात आनंद मानणारा एक कल्पक गणिती...
पर्डूसारख्या जागतिक ख्यातीच्या विद्यापीठात नावारूपाला आलेला,
एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक...
मराठीवरचं प्रेम परदेशांतही कायम ठेवणारा एक भाषाभिमानी...
जनसामान्यांत गणिताबद्दलची आस्था वाढीस लागावी, म्हणून
पुण्यात भास्कराचार्य प्रतिष्ठानची स्थापना करणारा एक संशोधक...
रशियन गणितसंशोधकांना ज्याच्याभोवती योगिक तेजोवलय दिसलं,
असा भारतीय योगशास्त्राचा एक गाढा अभ्यासक...
अशा विविध रूपांत वावरलेल्या
डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर नावाच्या
एका जगप्रसिध्द मराठी अवलियाचं हे आगळंवेगळं चरित्र. '
ISBN: 978-81-7434-940-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०१६
- सद्य आवृत्ती : नोव्हेंबर २०१८
- मुखपृष्ठ व आतील मांडणी : शेखर गोडबोले
- राजहंस क्रमांक : A-01-2016