Fakiree | फकिरी
खरं तर हा सर्वसामान्य माणूस. चारचौघांसारखंच
आयुष्य गेलं असतं त्याचं. बालपण, शिक्षण,
मग नोकरी अन् पोटासाठीची पायपीट. पण या प्रवासात
त्याला मिळाली सेवेची प्रेरणा, करुणेचा वसा.
ती प्रेरणा, तो वसा घेऊन पुढे पीडितांसाठी तो काम
करत राहिला. कुठेही थांबला नाही, दमला-भागला नाही,
स्वत:च्या सुखाचा विचारही त्याच्या मनात आला नाही.
तो निरंतर चालत राहिला. पडल्या-झडलेल्या आणि
तुटक्या-फाटक्या माणसाला अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी
दिशाहीन वा नाउमेद झालेल्या तरुणाईला पुढे चालावेसे वाटेल,
मार्ग निघत जाईल, जीवन बदलत जाईल असा पुढील
पिढ्यांना दिलासा मिळेल या
विश्वासातून केलेला अनघड प्रवास.
ISBN: 978-93-95483-36-0
- पहिली आवृत्ती : २८ जानेवारी २०२४
- मुखपृष्ठ : शेखर गोडबोले
- आतील चित्रे : डॉ. जागृती बोरसे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८.५"
- बुक कोड : A-02-2024