
Eka Nivadnukichi Goshta | एका निवडणूकीची गोष्ट
डॉ. संग्राम पाटील या युवकाचं
हे अनुभवकथन
म्हणजे
एका एकांड्या शिलेदाराची झुंज.
सत्तेची तटबंदी आणि भ्रष्टाचाराचे बुरूज.
तो निघाला होता यांना खिंडार पाडायला.
हातात हत्यारं – प्रामाणिकपणा आणि जिद्द.
साथीला मूठभर समविचारी सवंगडी.
परदेशातील सुस्थिर जीवन,
सुरक्षित व्यवसायातून लाभणारी समृद्धी
हे सारं झुगारून आपल्या सहचरीबरोबर
तो या लढ्यात उतरला.
कोण जिंकलं या लढ्यात ?
गल्लीपासून दिल्लीपर्यंत
सगळ्या पाय-यांवर लढली जाणारी
एका निवडणुकीची गोष्ट
ISBN: 978-81-7434-751-0
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०१४
- सद्य आवृत्ती : जानेवारी २०१७
- मुखपृष्ठ : अभय जोशी
- राजहंस क्रमांक : H-02-2014