Chedita Hruday he... | छेदिता हृदय हे…
'इस्रायल... अभागी ज्यू लोकांचा छोटासा देश... अरब देशांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या या पराक्रमी देशाबद्दल आपल्याकडे प्रचंड कौतुकमिश्रित कुतूहल आढळतं. त्या देशातील साहित्याची प्रातिनिधिक म्हणता येईल, अशी ही कादंबरी. त्यातही विशेष म्हणजे काही अंशी आपल्या भारतात घडणारी, भारतीय तत्त्वज्ञानाशी अप्रत्यक्षपणे संबंधित असणारी... मानवी नात्यांमधली अकल्पित गुंतागुंत, निखळ प्रेमाचे फुलोरे आणि बेभान वासनेचे काटेरी कंगोरे, जन्म-मृत्यू-पुनर्जन्म या संकल्पनांची मोहक वेटोळी, महत्त्वाकांक्षा आणि इच्छापूर्ती यांच्यात उभी असणारी नियती व तिच्या लहरी स्वभावानुसार माणसांच्या आयुष्याला मिळत जाणारी अतक्र्य वळणं... या सा-याचं वेधक चित्रण करणारी ही मूळ हिब्रू कादंबरी इंग्रजीवरून मराठीत... '
ISBN: 978-81-7434-398-7
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८..५"
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २००७
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २००७
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'