
Chanakya Chandragupta Ashok - Tridhara - Pataliputrache Rajaputra | चाणक्य चंद्रगुप्त अशोक - त्रिधारा - पाटलीपुत्राचे राजपुत्र
ही भारतभूमी आहे तेवीसशे वर्षांपूर्वीची.
आर्या चाणक्यांचं बुद्धिसामर्थ्य अन सम्राट चंद्रगुप्ताचं
बाहुबल यांनी साकारलं मौर्य साम्राज्य.
चंद्रगुप्तपुत्र बिंदुसारानंही केला राज्यविस्तार, परंतु व्यसनीपणामुळे आज तो आहे
मृत्युशय्येवर. त्याच्या पश्चात हे साम्राज्य कोसळून पडेल का ? ते कोसळू नये, यासाठी
प्रयत्न करणा-या व्यक्ती आणि शक्ती आहेत का कुणी ? बिंदुसारानं आर्य चाणक्याला
हद्दपार का केलं होतं ? निर्वासित चाणक्य, 'कौटिल्य' हे नाव आणि नवा वेश घेऊन
पाटलीपुत्रात चक्क एक वेश्यागृह चालवतो आहे ! का ? त्याला गुरू मानणारा मंत्री
राधागुप्त, त्याच्या पाऊलखुणांवर चालायला खरंच तयार आहे का ?
पाटलीपुत्राच्या जमिनीखालच्या भूयारांत वावरणारी एक गुप्त संघटना 'चिरंतन
वैदिक कृतिदल' आज काय अवस्थेत आहे ?
या आणि अशा कित्येक चक्रावून टाकणा-या प्रश्नांची थरारक उत्तरं देईल :
दोन हजार तीनशे वर्षांपूर्वीच्या विलक्षण सामर्थ्याच्या माणसांची, त्यांच्या संघर्षांची
आणि त्या अद्भूत काळाची ही कहाणी.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २०२२
- मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी : राहुल देशपांडे
- सुलेखन : बाबू उडुपी
- राजहंस क्रमांक : C-01-2022