
Chanakya Chandragupta Ashok - Tridhara - Kalingasanharacha Nyay | चाणक्य चंद्रगुप्त अशोक - त्रिधारा - कलिंगसंहाराचा न्याय
"सम्राट अशोकांना कलिंग रंगभूमीवर येऊ
द्या," हरदेव म्हणाले, 'त्यांनी काय उध्दवस्त
केलं, हे त्यांना त्यांच्या डोळ्यांनी पाहू द्या.
कुटिलतेचा अर्क असलेल्या चाणक्यांनी काय सर्वनाश घडवून आणला, ते
सम्राटांना समजू द्या. माझी कन्या देवी ही त्यांची खरी प्रेमिका होती.
रक्तानं माखलेल्या जमिनीवर निश्चल पडून राहिलेला तिचा मृतदेह अशोकानं
पाहावा. स्वत:च्या हजारो सैनिकांचेही मृतदेह अवश्य पाहावेत. आणि मगच
आपण कलिंगाची शरणागती सम्राटांना सादर करावी...'
तक्षशिलेत उगम पावलेली कथाधारा पाटलीपुत्र, विदिशा, उज्जयिनी, जुनागढ,
दंतपुरा असे कित्येक टप्पे घेत अखेर विसावते ती कलिंगाच्या महा संहारापाशी ..
तेव्हा हिशेब मांडला जातो न्याय-अन्यायाचा : मानवी अन दैवी !
दोन हजार तीनशे वर्षांपूर्वीच्या विलक्षण सामर्थ्याच्या माणसांची, त्यांच्या
संघर्षांची आणि त्या अद्भूत काळाची कहाणी.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २०२२
- मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी : राहुल देशपांडे
- सुलेखन : बाबू उडुपी
- राजहंस क्रमांक : C-03-2022