
बातमीदारी | Batmidari
'पत्रकारितेमध्ये बातमीदारी हे एक अविभाज्य अंग आहे. बातमीदारी या विषयाबाबत मार्गदर्शन करणारी इंग्रजी भाषेत परिपूर्ण अशी अनेक उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र मराठीमध्ये अशा पुस्तकांची वानवा दिसून येते. इंग्रजी पुस्तके उत्तम असली, तरी त्यातील संदर्भ परदेशातील असतात. त्यामुळे इथल्या मातीशी-माणसांशी नाते सांगणारे, अस्सल मराठी पत्रकारिता जोपासणारे मराठीतील हे वेगळे पुस्तक ठरावे. पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्यांना या पुस्तकाच्या साहाय्याने बातमीदारीतील गमभन तर शिकता येईलच, पण पत्रकारितेमध्ये अनेक वर्षे असलेल्यांना संदर्भ-ग्रंथ म्हणूनही त्याचा उपयोग करता येईल; तसेच पत्रकारितेबाहेरील सर्वसामान्य वाचकांसाठीही हे पुस्तक मौलिक ठरेल. '
- 'Pages: 244 Weight:0 ISBN:978-81-7434-438-0 Binding:कार्ड बाईंडिंग Size:8.5 X 11 सद्य आवृत्ती:जानेवारी 2010 पहिली आवृत्ती:नोव्हेंबर 2008 Illustrator:रविंन्द्र जोशी'