
Bakhar Isrochya Agnibananchi | बखर 'इस्त्रो'च्या अग्निबाणांची
'ही बखर कुण्या एका राजाची वा त्याच्या एखाद्या वीर शिलेदाराची नाही. ही आहे भारतीय शास्त्रज्ञांच्या अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील पराक्रमाची बखर. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. आज नावारूपाला आलेल्या या संस्थेची ही कथा. तिच्या पंखांखाली वावरणा-या जिद्दी आणि देशाभिमानी शास्त्रज्ञांची. त्यांनी उभारलेल्या अग्निबाणांची आणि ते अंतराळात सोडण्यासाठी लागणा-या वाहनांची. प्रयोगांच्या यशापयशाची, शास्त्रज्ञांमध्ये दडलेल्या माणसांमधील संघर्षाची. व्यक्तिगत मानापमानाची आणि सामूहिक सुखदुःखांचीसुध्दा ! '
ISBN: 978-81-7434-546-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०१२
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१२
- मुखपृष्ठ : कमल शेडगे'