
Bankanvishyayi Sarvakahi | बँकांविषयी सर्व काही
'पूर्वी दिवाणखान्यात रेंगाळणारे बँकिंग आता आपल्या थेट माजघरापर्यंत पोचले आहे. श्रीमंत-गरीब, नागरी-ग्रामीण असा ग्राहकांच्या बाबतीत भेद न करणा-या बँकिंगने उदारीकरणाच्या गदारोळात गेल्या 10-12 वर्षांत शब्दशः कात टाकली आहे. ग्राहकभिमुख होता होता या बँकिंगने ग्राहकांना पुरते गोंधळवूनही टाकले आहे. बँकिंगविषयी सर्व काही हे अशा गोंधळलेल्या ग्राहकांच्या मनात येणा-या असंख्य महत्त्वाच्या प्रश्नांना समर्पक, थेट आणि नेमकी उत्तरे देणारे पुस्तक आहे. वाचकांशी सरळ संवाद साधत, त्यांच्या शंकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे, त्यांच्या अडचणींवर मार्ग सुचवणारे असे हे आगळे पुस्तक लिहिले आहे विद्याधर अनास्कर या अभ्यासू, अनुभवी आणि जातिवंत बँकरने. बँकिंगविषयीच्या आपल्या सामान्यज्ञानाला छेद देणारी, क्वचित चकित करणारी, नवीनतम माहितीने भरलेली अशी ही उत्तरे आहेत; त्यामुळे फक्त बँक ग्राहकांनीच नव्हे तर बँकिंग क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावे आणि वारंवार संदर्भासाठी चाळत राहावे, असे हे पुस्तक ठरले आहे. '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००३
- सद्य आवृत्ती : मार्च २०१७
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
More Books By Vidhyadhar Anaskar | विद्याधर अनास्कर
