Bhatakanti | भटकंती
'आतापर्यंत आयुष्यात अनेक उद्योग केले. इंजिनिअरिंगपासून अभिनयापर्यंत. मनस्वी भटकणं आणि छायाचित्रण हे त्यांपैकी काही. आता उमगू लागलंय की सर्वांत जास्त आनंद मला भटकंतीतून मिळतोय, किंबहुना माझ्या सगळ्या घडणीचा पायाच ही भटकंती आहे. या-ना-त्या निमित्ताने सह्य-सातपुड्याच्या रांगांमधून फिरण्याची संधी मला मिळाली आहे. त्या परिसरातल्या म-हाटमोळ्या मंडळींमध्ये ऊठबस करताना मला जे अनुभव आले ते मी ‘माझी मुलुखगिरी’ या माझ्या पहिल्या पुस्तकातून तुमच्याशी शेअर केले. ‘भटकंती’ हे पुस्तक म्हणजेही मनमुराद भटकण्यातून मला मिळालेला आनंद तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न आहे....
ISBN: 978-81-7434-211-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००१
- सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०२० मुखपृष्ठ : सुभाष अवचट'