
Bharatachi Dharmanirpekshata Djokyachya Valanavar | भारताची धर्मनिरपेक्षता : धोक्याच्या वळणावर
'भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्या देशातील
धर्मनिरपेक्षता टिकून राहणे अत्यावश्यक आहे.
तथापि गेल्या सत्तर वर्षांतील आपली वाटचाल
मात्र अत्यंत निराशाजनक आहे. आता तर देश
हिंदुराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाला लागण्याची
शक्यता निर्माण झाली आहे. हे वळण अत्यंत धोक्याचे ठरेल,
असा गंभीर इशारा देणारे हे पुस्तक आहे.
घटनापरिषदेत झालेल्या मान्यवर नेत्यांच्या चर्चेपासून
असंख्य घटनातज्ज्ञांच्या, राजकीय नेत्यांच्या लेखनापर्यंत
विविध संदर्भ देत एका अनुभवसंपन्न,
तत्त्वनिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
निव्वळ टीकाटिप्पणी करण्यात समाधान न मानता
राष्ट्रीय परिस्थिती सावरण्यासाठी व सुधारण्यासाठी
काय काय करता येईल, याबद्दलच्या काही उपयुक्त
सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे या विचारप्रवर्तक
पुस्तकाचे मोल खचितच वाढले आहे.
सर्व विचारसरणींच्या विवेकी अनुयायांनी अवश्य वाचावे,
विचारात घ्यावे, अशा लक्षणीय पुस्तकाचा
तितकाच समर्थ अनुवाद.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५ "
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०१७
- मुखपृष्ठ : कमल शेडगे
- राजहंस क्रमांक : H-03-2017