Atoon Ugavalelya Kavita | आतून उगवलेल्या कविता

Atoon Ugavalelya Kavita | आतून उगवलेल्या कविता

काळाच्या एकाच बिंदूवर कवी प्र.द. कुलकर्णी उभे आहेत. 

तिथूनच त्यांच्या मनात एकाच वेळी 

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचे विविध 

विभ्रम उभारून येत आहेत; जसा काळ, तसे त्याचे डिमेन्शन,

तशी त्याची भाषा आणि तसे त्याचे सांगणे असते. 

एकाच कवीने तीन वेगवेगळ्या काळांच्या पटावर नजर ठेवून 

आयुष्याचे जे तत्त्वज्ञान तयार केले आहे, ते जगण्याचा हिशेबच. 

हा कवितासंग्रह कवीच्या जगण्याचा वैचारिक लेखाजोखा आहे. 

अर्थात हे तटस्थ तत्त्वज्ञान नव्हे. त्यात अंतस्थ तगमग आहे, 

आयुष्याला बसलेले चटके आहेत, त्यातून आलेला विद्रोह आहे, 

प्रेम आहे, आई-वडिलांविषयी आणि घराविषयीची कृतज्ञता आहे, 

एक कळकळ अन् व्याकुळता आहे आणि 

हातातून काही निसटून गेल्याचे कधीही कमी न होणारे दु:ख आहे. 

विश्वव्यापी माणूसपणाची घुसमटही आहे. 

अनेक संग्रहांच्या गर्दीमध्ये अगदी वेगळी असलेली 

ही कविता कवीविषयी एक वेगळेच काव्यनिधान निर्माण करते हे नक्की. 

अरुण म्हात्रे

ISBN: 978-93-95483-81-0
  • पहिली आवृत्ती : जुलै २०२३
  • चित्रकार : चंद्रमोहन कुलकर्णी
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५ "
  • बुक कोड : G-02-2023
M.R.P ₹ 170
Offer ₹ 153
You Save ₹ 17 (10%)