अर्थात (सायकॉम)
'अर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच 'अर्थात'! अतिशय अचूकपणे आणि रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना अतिशय उपयोगी ठरेल. डॉ. भालचंद्र मुणगेकर माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं 'अर्थात' एक इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. लेखकाची शैली प्रवाही, खिळवून टाकणारी आहे. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी आणि संशोधक दोघांनीही जरूर वाचावे. डॉ. डी. एम. नाचणे डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च, मुंबइ सर्वसमावेशी, बहुआयामी आकलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल मीमांसा आहे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका 'कंटाळवाण्या' भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून टाकते! डॉ. अभय पेठे डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग, माजी डीन, फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ अर्थक्षेत्रातील नामवंतांनी गौरवलेली विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि सा-यांसाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करून सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिध्दांत अन् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर मराठीत प्रथमच '
- 'Pages: 478 Weight:0 ISBN:978-81-7434-779-4 Binding:कार्ड बाईंडिंग Size:6" X 8.5" सद्य आवृत्ती:सप्टेंबर 2014 पहिली आवृत्ती:सप्टेंबर 2014 Illustrator:शोभा गोडबोले'