Ajcha Dinvishesh | आजचा दिनविशेष
'शालेय विद्यार्थ्यांवर योग्य वेळी सुसंस्कार घडणं अगत्याचं आहे. हे संस्कार शाळेतल्या सर्व इयत्तांच्या पहिल्या राखीव तासात घडावेत आणि क्रमिक पुस्तकांच्या बाहेरच्या ह्या विद्याधनाला डोळस संदर्भांचा आधार असावा, असं शासनाचं धोरण आहे. ह्या अपेक्षेला पूरक असं हे आजचा दिनविशेष या नावाचं पुस्तक अगदी सोप्या भाषेत तयार केलं आहे. ह्याचा उपयोग शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांनाही होईल. संतमहंत, सुधारकांपासून संशोधकांपर्यंत आणि साहित्यिक, कलावंतांपासून अग्रेसर राष्ट्रपुरुषांपर्यंत जीवनातल्या सर्व क्षेत्रांतल्या 365 कर्तृत्वसंपन्न व्यक्तींचा वेध इथे घेतलेला आहे. मार्मिक बोधकथांच्या आधारे नीतिमूल्यांचं शिक्षण देणारं, शास्त्रीय परिपाठ आणि मूल्यशिक्षण विषयाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारं मराठीतलं हे पहिलंच आणि एकमेव पुस्तक आहे. '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जुलै २००१
- सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१४
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'