जन्मतारीख:२८ नोव्हेंबर १९६९
*** शिक्षण:
१. IAS Officer
२. M.A English Literature
३. Degree in Law
*** राजहंस प्रकाशित साहित्य:
१. पानिपत
२. झाडाझडती
३. महानायक
४. चंद्रमुखी
५. लस्ट फॉर लालबाग
६. अण्णा भाऊ साठेंची दर्दभरी दास्तान
७. पांगिरा
*** पुरस्कार:
** पानिपत
१. नाथ माधव पारितोषिक, १९८९.
२. भारतीय भाषा परिषद पारितोषिक, १९९०
** झाडाझडती
१. प्रियदर्शिनी राष्ट्रीय पारितोषिक, १९९०
२. विखेपाटील पारितोषिक, १९९०
३. साहित्य अकादमी पुरस्कार, १९९२
** महानायक
१. गडकरी पुरस्कार, १९९८
* राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या `पानिपत’ आणि `झाडाझडती’ या दोन महत्त्वाच्या कालाकृतीनी त्यांना मराठी वाचकांमधे सर्वदूर पोचवले.
* १९९२चा साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार त्यांना `झाडाझडती’ या कादंबरीसाठी मिळाला.
* अलीकडेच श्री. पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
* त्यासाठी विशेषत: ‘झाडाझडती’ आणि अलीकडच्या ‘नागकेशर’ या दोन कादंबर्यांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये पासीघाट (अरुणाचल प्रदेश) येथे झालेल्या तेवीस भारतीय भाषांच्या बहुभाषिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
* श्री. पाटील यांच्या कादंबर्यांची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे होऊन त्या जनप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या `पानिपत’, `संभाजी’ आणि `महानायक या कादंबर्या इंग्रजीमध्ये वेस्टलँड अॅमेझॉन कंपनीने तर `झाडाझडती’ (A Dirge for the Damned) ही कादंबरी हॅचेट या कंपनीने प्रकाशित केली आहे.
* त्यांना प्रियदर्शनी नॅशनल अॅवॉर्ड, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार, कोलकात्याचा भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार असे सत्तरहून अधिक साहित्य पुरस्कार गेल्या तीन दशकांत प्राप्त झाले आहेत.
* पाटील यांच्या साहित्यगुणांचा गौरव श्री. सुनील गंगोपाध्याय, श्री. अमिताव घोष, इंदिरा गोस्वामी अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहित्यकांनी जाहीरपणे केला आहे.
* राज्य शासनाच्या सेवेत असताना आय. ए. एस. अधिकारी या नात्याने त्यांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अनेक वर्षे रखडलेले बांधकाम चौदा महिन्यांच्या अवधीत अग्रक्रमाने पार पाडले.
* ऐतिहासिक कादंबर्यांबरोबरच अनेक सामाजिक विषयांनाही त्यांनी हात घातला आहे.
* शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे ढिसाळ नियोजन व त्यातून येणारा अवर्षणाचा धोका(`पांगिरा’), मुंबईच्या * गिरणगावातील साठभर कापडगिरण्यांची विक्री व गिरणीवकामगारांचे हाल (`लस्ट फॉर लालबाग’),
* साखरधंद्यातील सुंदोपसुंदी (`नागकेशर’),
* लोक कलावंतांची हरपत जाणारी दुनिया व परवड (`गाभुळलेल्या चंद्रबनात’ व `चंद्रमुखी’),
* धरणग्रस्तांचे जगणे व मरणे (`झाडाझडती’) असे सामाजिक विषय व त्या पार्श्वभूमीवर पाटलांनी लिहिलेल्या त्यांच्या कादंबर्यांना मराठीसोबतच अनेक भारतीय भाषांमध्ये मोठी लोकप्रियता लाभली आहे.