विक्रम संपत हे लोकप्रिय भारतीय इतिहासकार आहेत, जे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि गौहर जान यांच्या चरित्रे लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
* २०२१ मध्ये, संपत यांची रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली.
* प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
विक्रम संपत यांचा जन्म आणि लहानपण हे बेंगलोरमध्येच गेले, त्यांनी बंगळुरूमध्ये श्री अरबिंदो मेमोरियल स्कूल आणि बिशप कॉटन बॉईज स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले.
* त्यांनी बीट्स पिलानी ( BITS Pilani) मधून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि गणितात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
* त्यांनी मुंबईच्या एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधून फायनान्समध्ये एमबीए केले. संपत यांनी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील स्कूल ऑफ म्युझिकमधून एथनोम्युसिकोलॉजी (ethnomusicology-वांशिक संगीतशास्त्र) मध्ये डॉक्टरेट (ऑक्टोबर २०१७) मिळवली आहे.
*** कार्य
* विक्रम संपत यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून काही गौरवशाली ऐतिहासिक पात्रांच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे. त्यांचे पहिले पुस्तक, स्प्लेंडर्स ऑफ रॉयल मैसूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ द वोडेयर्स हे म्हैसूरच्या वाडियार राजवंशाचा इतिहास होते.
* त्यांचे दुसरे काम —माय नेम इज गौहर जान: द लाइफ अँड टाइम्स ऑफ अ म्युझिशियन— हे ग्रामोफोनवर रेकॉर्ड करणारे भारतातील पहिले शास्त्रीय संगीतकार गौहर जान यांचे चरित्र आहे
* त्यांचे तिसरे पुस्तक - व्हॉईस ऑफ द वीणा: एस. बालचंदर, वीणा उस्ताद डॉ. एस. बालचंदर यांचे जीवनचरित्र आहे.
* त्यांचे चौथे काम सावरकरांचे दोन भागांमध्ये चरित्र आहे - सावरकर: इकोज फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट, १८८३-१९२४ आणि सावरकर: अ कॉन्टेस्टेड लेगसी १९२४-१९६६ . विक्रम संपत यांनी केलेल्या सावरकरावरील संशोधनामुळे ह्या पुस्तकाच्या माध्यमातून सावरकरांबाबत असलेले बरेच मतभेद दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.
*** पुरस्कार
त्यांना इंग्रजी साहित्यात साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला होता.
* गौहर जानवरील पुस्तकासाठी न्यू यॉर्कमधील ऐतिहासिक संशोधनातील उत्कृष्टतेसाठी ARSC आंतरराष्ट्रीय पुरस्कार.२०२१ मध्ये, संपतची रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली.