Vinay Narkar | विनय नारकर
विनय नारकर
गेल्या १२-१३ वर्षांपासून वस्त्ररचनाकार (Textile Designer) म्हणून कार्यरत.
* हातमाग विणकरांकडून साड्या विणून घेणे, हे कामाचे मुख्य स्वरूप.
* देश-विदेशात साड्यांची प्रदर्शने. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रकाशनांद्वारे कामाची दखल.
* बाँबे हाऊस (टाटा हेडक्वॉर्टर), मुंबई येथे टेक्सटाईल इंस्टॉलेशन,
* वुमन इन डिजाइन या आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकार परिषदेसाठी टेक्सटाईल इंस्टॉलेशन.
* झपूर्झा संग्रहालय येथे वस्त्रसंग्रहालयात मानद क्युरेटर म्हणून कार्यरत.
* पश्चिम दख्खन भागातील साड्यांच्या विविध परंपरांचा अभ्यास करून जुन्या रचना नव्याने विणून घेणे, या कामात विशेष रस.
* महाराष्ट्रातील वस्त्रसंस्कृती हा अभ्यासाचा विषय. विविध वृत्तपत्रांमधून लेखन.