वंदना अत्रे
आजवर सहा अनुवादित पुस्तके आणि तीन स्वतंत्र पुस्तके प्रकाशित. कवी कुसुमाग्रज ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘नक्षत्रांचे आश्वासन' या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या लेखांचा समावेश असलेल्या पुस्तकाची आखणी आणि संपादन. भारतातील विविध राज्यांत, विविध सामाजिक क्षेत्रात काम करणार्या स्त्रियांच्या कामाचा आणि त्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रातील स्त्रियांच्या नेतृत्वाचा आढावा घेणार्या ‘पाऊल पुढे पडताना' ह्या, संशोधन आणि प्रत्यक्ष भेटींवर आधारित, पुस्तकास २०११ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कमल आणि के. पी. भागवत पुरस्कार (वैचारिक, स्त्री-जीवनविषयक प्रकारातील) ‘विजयाचे मानसशास्त्र' ह्या अनुवादित पुस्तकास २०१० साली नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्राप्त.
* तीन दशके ‘गावकरी' ह्या वृत्तपत्रात मुख्य सहसंपादक म्हणून काम सध्या मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत. विविध प्रकाशनगृहे आणि सामाजिक संस्था आणि उद्योगक्षेत्र ह्यांच्या प्रकाशनांसाठी संपादक आणि अनुवादक म्हणून काम करीत आहे.
* सध्या कॅन्सरग्रस्तांसाठी ‘आरंभ' ह्या पुढाकारातर्पेâ समुपदेशन आणि जीवनशैली शिक्षण देण्याचे काम प्राधान्याने करीत आहे.
शोभना प्रकाश भिडे
बी.एस्सी., डी. एम.एल.टी., बी.एड.
* गेली २० वर्षे नाशिकमधील ‘आनंदनिकेतन' या प्रयोगशील शाळेत विज्ञान व गणित विषयांचे अध्यापन.
* ६ वर्षे एस.एस.सी. बोर्डाच्या विज्ञान अभ्यास मंडळाचे सदस्य.
* एनसीटीई (National council for teacher education)या केंद्रस्तरीय चौदा सदस्यीय मंडळाच्या माजी सदस्य.