डॉ. सौ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी (पूर्वाश्रमीच्या सुषमा कुलकर्णी,
जन्म : बेळगाव, १ ऑक्टोबर १९५०) या मराठी अनुवादक आहेत.
* त्यांनी यू.आर. अनंतमूर्ती, एस.एल. भैरप्पा, वैदेही, के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी व इतर कन्नड लेखकांच्या साहित्याचे मराठीमध्ये अनुवाद केले आहेत.
* १९८२ मध्ये उमा कुलकर्णी यांचा शिवराम कारंत यांच्या कादंबरीचा 'तनमनाच्या भोवऱ्यात. हा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला.
* यानंतर कारंतांचेच 'डोंगराएवढा' हे अनुवादित पुस्तक प्रकाशित झाले.
* पुढे उमा कुलकर्णी यांनी एस.एल. भैरप्पा यांच्या कानडी कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद करायचा सपाटा लावला. सुरुवात भैरप्पांच्या 'वंशवृक्ष' पासून सुरुवात करून २०१९ सालापर्यंत त्यांनी भैरप्पांच्याच एकूण बारा कादंबऱ्या अनुवादल्या आहेत.
* सौ. उमा कुलकर्णी यांनी केलेले ५५हून अधिक अनुवाद पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहेत.
*** सौ. उमा कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार
* साहित्य अकादमी पुरस्कार
* महाराष्ट्र फाऊन्डेशनचा विशेष पुरस्कार (१९९७)
* महाराष्ट्र सरकारचे तसेच कर्नाटक सरकारचे बरेच पुरस्कार
* रेखा ढोले पुरस्कार
* 'संवादु अनुवादु'ला महाराष्ट्र साहित्य परिषद (मंगळवेढा, अखिल मराठी साहित्य परिषद (बडोदा),
* अश्वमेध ग्रंथालय (सातारा),
* साहित्यप्रेमी भगिनी मंडळ (पुणे) (सर्व सन २०१७मध्ये)
* भास्करराव ग. माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अक्षरगौरव साहित्य पुरस्कार (२०१७)
* मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा प्रा. वि.ह. कुलकर्णी पुरस्कार (सन २०१८)
* दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पहिला अनुवाद पुरस्कार (सन १९८९)
* 'वंशवृक्ष'साठी महाराष्ट्रगौरव पुरस्कार (१९९०)
* 'पर्व'साठी स.ह. मोडक पुरस्कार (१९९९)
* 'पारखा'साठी इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिरातर्फे म.बा. जाधव पुरस्कार (२०१५)
* 'पारखा'साठी पुणे ग्रंथालयाचा वर्धापन पुरस्कार
* कुवेंपु भाषाभारतीतर्फे विशेष सन्मान