सुरेश हावरे हे प्रथितयश उद्योजक आणि उद्योगप्रेरणा देणारे प्रभावी वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांनी नागपूर विद्यापीठातून केमिकल इंजिनिअिंरगमध्ये बी.एससी.(टेक.) ही पदवी संपादित केली. भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमधून त्यांनी न्यूक्लिअर इंजिनिअिंरगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. इतिहास या
विषयात एम.ए. केले आणि ‘अॅफोर्डेबल नॅनो हाउिंसग' या विषयासाठी मुंबई विद्यापीठाकडून पीएच.डी. (डॉक्टरेट) ही पदवी त्यांनी संपादन केली आहे.
* नागपूर विद्यापीठाचे ते मेरिट स्कॉलर व इंजिनिअिंरगमधील सुवर्णपदकविजेते आहेत. डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जीमध्ये त्यांनी २७ वर्षे वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून सेवा केली. न्यूक्लिअर इंजिनिअिंरगमधील त्यांचे ३७ शोधनिबंध नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. व्हिएन्ना येथील
‘आयएईए' या अणुशास्त्रातील सर्वोच्च संस्थेत भारतीय शास्त्रज्ञांच्या चमूचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
* याशिवाय गेली २५ वर्षे ते बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. सध्या ते सुप्रसिद्ध हावरे उद्योगसमूहाचे नेतृत्व करीत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान असते. त्यांना अनेक नामांकित
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पुरस्कार मिळालेले आहेत. जे.एन.पी.टी.चे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे ते अध्यक्ष राहिले आहेत. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री दर्जा प्रदान करण्यात आलेला होता.
* गिर्यारोहण हा त्यांचा आवडीचा छंद आहे. एव्हरेस्ट बेस कॅँप व आयलँडपीक वर त्यांनी चढाई केली आहे. तसेच अंटाकर््िटकाची साहसी फेरी त्यांनी पूर्ण केली आहे.
पत्ता : २३०५, हावरे इन्फोटेक पार्क, सेक्टर-३० वाशी,
नवी मुंबई (महाराष्ट्र), ४००७०५.
ईमेल : md@haware.in
भ्रमणध्वनी: ९८२१८६३३९७ (फक्त SMS/WA)