* चित्रपट आणि संगीत या विषयांचे अभ्यासपूर्वक रसग्रहण करणारे सुहास किर्लोस्कर नव्या जुन्या चित्रपटामधील बारकावे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून, दृक श्राव्य कार्यक्रम आणि लेखनामधून मांडतात.
* चित्रपट आणि चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत मैफिलींचे विश्लेषण सांगणारे त्यांचे लेख / व्याखाने त्या विषयाची गोडी लावणारी असतात.
* सुहास किर्लोस्कर लिखित चित्रपट संगीताचे विविधांगी विश्लेषण करणारे 'गाता रहे' हे पुस्तक ३ नोव्हेंबर रोजी राजहंस प्रकाशन तर्फे प्रसिध्द झाले आहे., ज्यामध्ये चित्रपट संगीतामध्ये हाताळलेल्या प्रकारांची ओळख आणि तीस पेक्षा अधिक वाद्यांची माहिती, त्याच्या चित्रपट संगीतामधील वापरलेल्या उदाहरणांसह लिहिली आहेत.
*** सुहास किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या लेखमाला
* संगीत संगत - गाण्यांच्या अनुषंगाने वाद्यांविषयी माहिती - महाराष्ट्र टाईम्स (२०२१)
* गीतागंध - सकाळ (२०१७)
* यशस्वी उद्योजक - चित्रपटातून वेगवेगळी बिझिनेस स्किल्स कशी शिकता येतात
* अक्षरनामा - चित्रपट विश्लेषण (२०२१)
* तरुण भारत - आनंददायी शिक्षण कसे घ्यावे (२०२२-२३-२४)
* साप्ताहिक सकाळ - कथेपलीकडचा चित्रपट (२०२३-२४)
*** संगीत, चित्रपट अशा कलांचा आस्वाद कसा घ्यावा, कलेची निर्मिती होत असताना टीमवर्क या अंगाने आणि विविध दृष्टीकोनातून त्याकडे कसे पहावे याविषयी सुहास किर्लोस्कर लेखन करत असतात.
* संगीत आस्वादनाचे विविध कार्यक्रम, चित्रपट रसास्वाद शिबिराचे आयोजन गेली काही वर्षे ते करत आहेत.
* सुहास किर्लोस्कर यांनी गेल्या दहा वर्षात आनंददायी शिक्षण, व्यावहारिक गणित, coomunications skills, करियर गायडन्स, interviewing skills अशा विषयांवर त्यांनी विविध शाळा-कॉलेजमध्ये व्याख्याने दिली आहेत.
* भोर तालुक्यातील १०० गावातल्या शाळांमधे या वर्षी ते वाचनाची आवड लागण्याचे वर्ग घेत आहेत.