Home / Authors / Suhas Bahulkar | सुहास बहुळकर
Suhas Bahulkar | सुहास बहुळकर
Suhas Bahulkar | सुहास बहुळकर

जन्म : १० ऑक्टोबर १९५४
suchasbahulkar@gmail.com

* * शिक्षण :
* भावे स्कूल (पेरूगेट, पुणे) येथून मॅट्रिक.
* सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे कलाशिक्षण,
* जी.डी.आर्ट ही पदविका प्रथम वर्गात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण,
* १९७०-१९७५. फेलोशिप प्रदान.
* नोकरी : सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्राध्यापक, १९७५-१९९५.
* चित्रप्रदर्शने : देशात व परदेशात १९ एकल व ५८ सामूहिक प्रदर्शने.

** पारितोषिके :

* बालवयात शंकर्स विकली- दिल्ली, सोव्हिएट चाईल्ड आर्ट काँपिटिशन व रॉयल ड्रॉईंग सोसायटी लंडन यांची पारितोषिके व हायली कमांडेड सर्टिफिकेट १९६२-१९६८.
* विविध अखिल भारतीय प्रदर्शनांमध्ये एकूण १५ पारितोषिके. त्यात सुवर्णपदक, रौप्यपदक व
प्रदर्शनातील सर्वोच्च सन्मानांचा समावेश १९७६-१९९३.
* वयाच्या ३९व्या वर्षी चित्रकलाक्षेत्रातील स्पर्धात्मक जगातून निवृत्त होण्याचा निर्णय

* *व्यावसायिक यश :
* भारतातील अनेक प्रतिष्ठित शासकीय व खाजगी संस्थांसाठी व्यक्तिचित्रण. राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, रिझर्व बँक, टाटा ग्रुप, एशियाटिक सोसायटी- मुंबई इत्यादी.
* भारतात विविध संस्थांसाठी भव्य भित्तिचित्रे व भित्तिशिल्पे. उदाहरणार्थ, राजा केळकर म्युझियम- पुणे,
हॉटेल मौर्या शेरेटन-दिल्ली, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक- मुंबई, टिळक स्मारक मंदिर- पुणे इत्यादी.
* प्रकल्प : लोकमान्य टिळक म्युझियम-पुणे, नेहरू सेंटर-मुंबई, रामदर्शन-चित्रकूट.
* महत्त्वपूर्ण कामगिरी : प्रजासत्ताक दिन सोहळा- नवी दिल्लीसाठी ‘महाराष्ट्र शासन, माझगांव डॉक,
डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी अशा विविध आस्थापनांसाठी चित्ररथनिर्मिती, १९७१ ते १९८०.
त्यातील १९७१ व १९७३ च्या चित्ररथांना ‘सुवर्णचषका’चा बहुमान.

** समाजोपयोगी कार्य :
* सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट-मुंबई, येथील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या व मौल्यवान चित्रसंग्रहाचे जतन व संवर्धन १९७३ ते १९९५.
* जहांगीर आर्ट गॅलरीच्या निधिसंकलनासाठी विस्मरणात गेलेल्या दिवंगत आणि एकेकाळी गाजलेल्या
चित्रकारांच्या चित्रकृतींच्या ८ प्रदर्शनांचे आयोजन व अभिरक्षण (curation)१९९८ ते २००२.
चित्रकार दीनानाथ दलाल : चित्र आणि चरित्र

* नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट- मुंबई या भारत सरकारच्या संस्थेसाठी तीन महत्त्वपूर्ण प्रदर्शनांचे
आयोजन व अभिरक्षण २०१६, २०१७, २०१८.
* कलाविषयक कार्य करणार्‍या विविध शासकीय सदस्य व खाजगी संस्थांचे सल्लागार म्हणून कार्यरत.

* * प्रकाशित साहित्य :
* २००५ पासून विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यावर चित्रशिल्पकलेविषयक लेखन.
* २०१५ पासून मराठी व इंग्रजीतील ८ पुस्तकांचे महाराष्ट्रातील व देशातील प्रतिष्ठित संस्थांतर्फे प्रकाशन.
उदाहरणार्थ, ग्रंथाली, राजहंस प्रकाशन, नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट- भारत सरकार, ललित कला
अकादमी- भारत सरकार इत्यादी.
* यातील तीन पुस्तकांना एकूण ८ पुरस्कार. उदाहरणार्थ : उत्कृष्ट चरित्र- महाराष्ट्र शासन, केशवराव
कोठावळे पुरस्कार, बी. रघुनाथ पुरस्कार इत्यादी.

** संपादन :
* महाराष्ट्रातील चित्र-शिल्पांवरील ‘दृश्यकला’ या कोशाचे संकलन व संपादन, २००६ ते २०१३.
* Encyclopaedia : Visual Art of Maharashtra, Artst of the Bombay School and Art
Institutions (Late 18th to Early 21st Century) या इंग्रजी कोशाचे संकलन व संपादन, २०१५ ते
२०२१.

** सन्मान :
* जीवनगौरव पुरस्कार- द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, २००६.
* गोदा गौरव सन्मान- कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक- २०१४.
* डी.लिट. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ- पुणे २०१८.
* जीवनगौरव पुरस्कार- चतुरंग प्रतिष्ठान- २०१८.
* ‘रूपधर’, जीवनगौरव पुरस्कार, द बॉम्बे आर्ट सोसायटी, २०१९.
* याशिवाय विविध दूरदर्शन चॅननल्स आणि संस्थांतर्पेâ कलाविषयक कार्य व लेखन यासाठी अनेक
सन्मान.
सुहास बहुळकर हे एक उत्तम चित्रकार, प्राध्यापक, कलासंवर्धक, संशोधक, लेखक, संपादक आणि
अभिरक्षक म्हणून ख्यातनाम असून मुंबई येथे वास्तव्यास असतात.

Suhas Bahulkar | सुहास बहुळकर ह्यांची पुस्तके