टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) खोडद (ता. जुन्नर, जि. पुणे) या वेधशाळेत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून चौतीस वर्षांपासून कार्यरत.
* विज्ञान-तंत्रज्ञान प्रसाराच्या कार्यात सक्रिय सहभाग.
* या कार्याचा एक भाग म्हणून वर्तमानपत्रे (लोकसत्ता, सकाळ, लोकमत);
नियतकालिके (सृष्टीज्ञान, विज्ञानपत्रिका, विज्ञानवार्ता, अंनिस वार्तापत्र आणि समाजमाध्यमांमध्ये (अक्षरनामा) विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित स्फुटलेखन.
* प्रकाशित साहित्य :
१. रेडिओ खगोलशास्त्राचा परिचय करून देणारे पुस्तक : `रेडिओ दुर्बीण - अदृश्य विश्वाचा वेध'
(राजहंस प्रकाशन) या पुस्तकाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक, पुणे या संस्थेचा पुरस्कार.
२. भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे चरित्र : `विज्ञानयात्री डॉ. गोविंद स्वरूप' (राजहंस प्रकाशन).
३. पहिल्या समानव चांद्र मोहिमेवर आधारीत पुस्तक : `अपोलो ११ - माणसासाठी एक पाऊल मानवजातीसाठी एक उत्तुंग झेप' (सकाळ प्रकाशन).
* दै. सकाळच्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीसाठी `विज्ञानक्षेत्रे' आणि साप्ताहिक सकाळसाठी `विज्ञानतीर्थे' सदरलेखन.
* `द पीपल्स पोस्ट' या पाक्षिकासाठी मानवी वाटचालीतील टप्पे विशद करणारे सदर.
* मराठी विश्वकोशासाठी अवकाश आणि तंत्र-विज्ञानविषयक नोंदींचे लेखन
* आकाशवाणी केंद्रांसाठी विज्ञानविषयक मालिका आणि पहिल्या मानवी चांद्रमोहिमेसंदर्भात नभोनाट्य लेखन, मुलाखत, भाषण.
* राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर विज्ञान-तंत्रज्ञानविषयक शोधनिबंध, लेखनसादरीकरण तसेच कार्यशाळा, शिबिरे व परिसंवादांमध्ये सहभाग.
* विद्यालय-महाविद्यालय आणि शैक्षणिक तसेच वैज्ञानिक संस्थांमधून विज्ञान-तंत्रज्ञान विषयांवरील सादरीकरण.
* खोडद येथील `खोडद ग्रामीण विज्ञान केंद्रा'त मार्गदर्शक म्हणून कार्यरत.