दिलीप विष्णू चित्रे ( - सन सिटी सेंटर-फ्लॉरिडा (अमेरिका), ३० जून २०१७) हे अमेरिकेत स्थायिक झालेले एक मराठी कवी आणि लेखक होते.
* अमेरिकेतील भारतीयांच्या अनुभवावर आधारलेलं 'अलिबाबाची हीच गुहा' हे त्यांचे नाटक खूप गाजले होते. अमेरिकेसोबत भारतातही या नाटकाचे अनेक प्रयोग पार पडले. इ.स. १९७० च्या दशकात जगभरातील वेगवेगळ्या देशांत वास्तव्यास असलेल्या लेखकांकडून लिहून घेतलेल्या कथांचा एक मोठा प्रकल्प त्यांनी अंगीकारला होता. त्यावर आधारित 'कुंपणाबाहेरचे शेत' नावाचा कथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केला होता.
* दि्लीप आणि मीना चित्रे हे दांपत्य मूळचे बडोद्याचे, पण ४५हून अधिक वर्षे त्यांचे वास्तव्य अमेरिकेत होते. 'गोठलेल्या वाटा', 'गौरी गौरी कुठे आलीस', 'पानगळीच्या आठवणी' ही शोभाताईंची काही गाजलेली पुस्तके असून,
दिलीप वि. चित्रे यांचा १९८८ साली प्रकाशित झालेला 'हिमगंध' हा कवितासंग्रह आणि त्यांचे अमेरिकी जीवनावरचे 'अलिबाबाची हीच गुहा' हे संगीत नाटक सुपरिचित आहे.
* अमेरिकेत मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, काव्यवाचन अशा मराठी मनाशी संबंधित अनेक गोष्टींचे संयोजन त्यांनी केले..
* 'महाराष्ट्र फाऊंडेशन' या संस्थेमध्ये तिच्या स्थापनेपासूनच शोभा आणि दिलीप विष्णू चित्रे यांनी कार्य केले.
* त्या दोघांनी मिळून केलेला एक प्रकल्प म्हणजे 'मीना - दि हिरॉईन ऑफ अफगाणिस्तान' ह्या मेलडी चेव्हिस यांच्या इंग्रजी पुस्तकाचा 'मीना - अफगाण मुक्तीचा आक्रोश' या नावाचा अनुवाद. हा २००८ सालच्या जूनमध्ये अमेरिकेत प्रकाशित झाला.