शशिधर भावे
* जन्म २९ नोव्हेंबर १९३५ चा. `लौंड्रीवाले भावे' म्हणून प्रसिद्ध.
* पदभ्रमणाचा छंद. द्वारका ते कन्याकुमारी ते रामेश्वर हा भारताचा समुद्रकिनारा पायी प्रवास. नर्मदा परिक्रमेतील ७०० किलोमीटरचे पदभ्रमण. मणिमहेश, छोटा कैलास, अमरनाथ वगैरे पदभ्रमणे.
* वयाच्या ७१व्या वर्षी समवयस्क मित्रांना घेऊन ईशान्य भारतातील सातही राज्यांचा प्रवास. त्यातील मेघाल यात तीन ट्रेक. ७३व्या वर्षी मनालीजवळील सोलंगनालायेथे पॅराग्लायडिंग. ७९व्या वर्षी अवघड प्रचीतगडावर यशस्वी चढाई
* भारतातील विविध राज्यांमधील असंख्य पर्यटनस्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन किंवा त्यांच्याबद्दल ची विविध नियतकालि कांत प्रसिद्ध झालेलीवर्णने वाचून सुमारे ९००० पृष्ठांची माहिती संकलि त.
* `मनोभावे देशदर्शन' मालि केतील `अरुणाचल प्रदेश', `असम', `मेघाल य', `सिक्किम', `मणिपूर', `नागालँड', `त्रिपुरा' आणि `मिझोरम' ही अन्य पुस्तके प्रकाशित झाली आहेत. `
* असम' या पुस्तकाला ठाणे येथील `मराठी प्रवासवर्णन लेखक-वाचक मंच' पुस्तक स्पर्धा २००९चा पुरस्कार.
* २०१२मध्ये `मेघाल य' व `सिक्किम' या दोन्ही पुस्तकांना पुणे येथील `महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे'तर्फे पारितोषिके. `
* त्रिपुरा' या पुस्तकाला ठाणे येथील `मराठी प्रवासवर्णन लेखक-वाचक मंच' स्पर्धा २०१७चा पुरस्कार.
* डिसेंबर २०१४मध्ये `माय होम इंडिया'च्या पुरस्कार समारंभात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते ईशान्य भारतावरील पुस्तक-लेखनाबद्दल सन्मानचिन्ह.
* नोव्हेंबर २०१७मध्ये `असम असोसिएशन मुंबईला २५ वर्षे पूर्ण झाली, त्या कार्यक्रमात `गेस्ट ऑफ ऑनर’ म्हणून निमंत्रण. चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांसमोर प्रदीर्घ मुलाखत.
* ईशान्य भारताची इतर भारतीयांना ओळख व्हावी म्हणून आजपर्यंत अनेक व्याख्याने. वनवासी कल्याण आश्रम, विद्यार्थी साहाय्यक समिती, हास्यसंघ, ज्येष्ठ नागरिक संघ यांसारख्या अनेक सामाजिक संस्थांशी संबंध.