Home / Authors / Satish Mutatkar | सतीश मुटाटकर
Satish Mutatkar | सतीश मुटाटकर
Satish Mutatkar | सतीश मुटाटकर

सतीश मुटाटकर : बिट्स पिलानी आणि एफ.एम.एस. दिल्ली युनिव्हर्सिटी,

* यासारख्या सन्माननीय शैक्षणिक संस्थांचे माजी विद्यार्थी असणारे सतीश मुटाटकर पंधरा वर्षांच्या देदीप्यमान कॉर्पोरेट करिअरनंतर सर्जनशील क्षेत्राकडे वळले.

* गेल्या तीस वर्षांहूनअधिक काळ ते टीव्ही जाहिराती, टीव्ही सीरीज आणि कॉर्पोरेट फिल्मसाठी लिखाण, दिग्दर्शन आणि निर्मिती करत आहेत.

* हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखनही केलेलं आहे. व्ही.जी. सामंत यांच्या `हनुमान', अनुराग कश्यप यांच्या `रिटर्न ऑफ हनुमान' या लहान मुलांसाठी असलेल्या दोन्ही अॅ निमेशन फिल्मसाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे. ऑस्कर नामांकनपात्र `चिल्ड्रन ऑफ हेवन' या माजिद माजिदी या इराणी दिग्दर्शकाच्या चित्रपटाच्या प्रियदर्शन यांनी केलेल्या हिंदी ऊश्पांतरासाठीपण त्यांनी गीतलेखन केलं आहे.

* मुटाटकर यांची अनेक गीतं गाजली असून दलेर मेहंदी यांनी गायलेलं `आसमाँ को छूकर देखा' हे गीत अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे सोनू निगम, शान, वैâलाश खेर, विजयप्रकाश, पलाश सेन, तपस रेलिया, मधुश्री, स्नेहा पंत आणि सपना मुखर्जी यांच्यासारख्या अनेक गायकांनी एकत्र येऊन गायलेलं `महाबली महारुद्र' आणि श्रवण यांनी गायलेलं `अकडम बकडम' हे गीतही प्रसिद्ध आहे.

* इस्रोच्या नियोजित सायन्स चॅनेल प्रोजेक्टसाठी मुटाटकर हे प्रमुख सल्लागार होते. डीएनए ऑनलाईनकरता त्यांनी बरंच स्तंभलेखनही केलेलं आहे.

* लेखकाचे विचार
हे पुस्तक प्रत्यक्षात येण्याकरता अनेकांचा हातभार लागला. त्यांचं माझ्यावर मोठं ऋण आहे. माझे सहलेखक यशवंत मराठे यांच्याप्रति मी सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना घेऊन ते मला भेटल्यावर माझी
उत्सुकता चाळवली गेली. या पुस्तकासंदर्भात संशोधन कऊश्न लिखाणासाठी किती वेळ लागेल हे जर मला माहीत असतं, तर मी त्यांना `आभारी आहे' असं म्हणून कदाचित निरोप दिला असता! तरीसुद्धा, त्यांनी सातत्यानं आग्रह धरला. त्यांच्या चेह-या वरचं स्मित किंवा संतुलन पूर्ण लेखनप्रवासात कधीही ढळलं नाही.

प्रवीण रत्तन या माझ्या मित्राचेही मी आभार मानू इच्छितो. पिलानीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग करत असताना १९६७-७२ आम्ही एकत्र होतो. व्यावसायिक लिखाणाची व्याख्या अनेकदा `पुन:पुन्हा लिहून काढणं' अशीही केली जाते. असं लिखाण करत असताना आपल्यासमोर एखादा सक्षम `साउंडिंग बोर्ड' गरजेचा असतो. प्रवीण माझ्यासाठी असाच साउंडिंग बोर्ड आहे. अत्यंत नि:स्वार्थीपणे, प्रदीर्घ काळापासून तो माझ्याबरोबर आहे. पिलानीच्या व्हॉट्सअप ग्रुप्समधले अनेक मित्र वेळोवेळी रोचक माहिती पुरवत असतात, त्या सगळ्यांचे मी एकत्रित आभार मानतो.

माधवी, शीला, मेघना, रोहित, शिवानी, अद्वैत या माझ्या कुटुंबीयांचा सतत मला पाठिंबा होता. त्या सगळ्यांचेही आभार. माझी नात आरिया आणि नातू रियान म्हणजे माझ्या काळजाचे तुकडे आहेत. त्या दोघांना मी कसं बरं विसरू ? येता-जाता माझ्या अभ्यासिकेत येऊन माझ्या पुस्तकांवर त्यांनी हल्ला चढवला नसता, तर हे पुस्तक कदाचित तीन महिने आधीही पूर्ण झालं असतं; परंतु केवळ नातवंडांच्याच सान्निध्यात जी जास्तीची अंतर्दृष्टी लाभते, तिला मात्र मी मुकलो असतो.

हे पुस्तक मी माझी मोठी बहीण कै. शशिकला मुटाटकर हिला अर्पण करतो. तिच्या आठवणींशिवाय एकही दिवस सरत नाही.