
Sarita Avad | सरिता आवाड
लौकिक ओळख सांगायची तर प्रसिद्ध लेखिका सुमती देवस्थळी यांची मुलगी. पण इथेच त्यांची ओळख संपत नाही. तर एक बॅंक कर्मचारी म्हणून अधिकारी पदापर्यंतचा प्रवास, त्याआधी महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासून साहित्य-सांस्कॄतिक वातावरणासह सामाजिक राजकीय विचारधारा संघटना यांच्याशी परिचय, सहभाग.
* सेवादल, युक्रांद, मागोवा गट, दलित पॅंथर ते जनता पार्टीपर्यंतचा प्रवास, कधी थेट सहभागातून कधी दुरून, तर कधी अभ्यास म्हणून त्यांनी जवळपास ३० ते ४० वर्षे केला, जो कालांतराने स्त्री चळवळीशी जोडून तिथेच स्थिरावला.